Jump to content

राजा दिनकर केळकर संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
राजा दिनकर केळकर संग्रहालय

राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय आहे.[] हे संग्रहालय सन. १८९६ ते १९९० पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.[]

१९२२ साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय, वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.[ संदर्भ हवा ]

कवी अज्ञातवासी

दिनकर गंगाधर केळकर म्हणजे मराठीत अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी होत. राम गणेश गडकरी हे त्यांचे काव्यगुरू होते.

दिनकर केळकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेला वैशिष्ट्यपूर्ण स्तूप

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराशेजारच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाखाली एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूप आहे. पुलापासून मुठा नदीच्या उजव्या तीरावरून शनिवारवाड्याच्या दिशेने जाताना उजव्या बाजूस हा स्तूप दिसतो. हा स्तूप कुणा कुशल कारागिराने तयार केला असे जाणवते. हा दगडी स्तूप तळाशी चौकोनी असून, त्यावर दोन अष्टकोनी टप्पे आणि सर्वात वरती शिवलिंग आहे. बाजूला चार स्तंभ असून त्यावर सोळा मूर्ती आहेत. पायाशी कासव, शंख आदी शुभचिन्हे आहेत.

कोनशिलेवरील माहितीनुसार हा स्तूप गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारला. गंगाधर केळकर यांचे निधन २० ऑगस्ट १९२८ रोजी झाले.

विभागवार संग्रहालयाची दालने

मस्तानी महाल
  1. लाकडी कोरीव काम विभाग:-

लाकडी नक्षीकामाचे छत, दरवाजे, खडक्या, गणेशपट्या, झरोके, जयविजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषानच्या मूर्तीसुद्धा या विभागात आहे. या वस्तू महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत वेगवेगळ्या राज्यातून जमविले आहे.

  1. प्रसाधने व गुजरात दालन विभाग:-

तळपाय घासण्यासाठी वापरीत असलेल्या वजा-या, कुंकुमकरंडे, वेणीफणीच्या पेट्या, आरसे, सुरमादान, अत्तरदान, कंगवे,फण्या, स्त्रियांचे दागदागिने

अत्तराच्या कुप्या

चंद्रशेखर आगाशे विभाग

या शाखेत सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर आगाशे यांनी आपला पुत्र दिवंगत उद्योगपती चंद्रशेखर आगाशे यांच्या पुरातन भारतीय वाद्य संग्रहांचा समावेश केला आहे.[] चंद्रशेखर आगाशे यांच्या विधवा आणि संग्रहालयाचे संस्थापक डॉ दिनकर जी. केळकर यांच्या नातलगांचा सन्मान करीत त्यांचे चौथे चुलत भाऊ अथवा बहीण.[][]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

बाह्य दुवे

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "RAJA DINKAR KELKAR MUSEUM A CALL ANSWERED - A LEGACY BESTOWED . . ". http://rajakelkarmuseum.org. 2019-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20.12.2019 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 26 (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ भावसार, धनश्री. "राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय". www.thinkmaharashtra.com. 2019-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "Chandrashekhar Agashe museum- Section of Raja Dinkar Kelkar museum". web.archive.org. 2017-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-11 रोजी पाहिले.
  4. ^ Barve, Vartak & Belvalkar 2002, p. 3,4.
  5. ^ Kelkar, Bhaskar. "KelkarKulVruttant - kelkar.net". www.kelkar.net. 2019-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-11 रोजी पाहिले.