Jump to content

गुरू तेग बहादुर नगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरू तेग बहादूर नगर या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरू तेग बहादूर नगर is located in मुंबई
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर

गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर एक स्थानक आहे. या भागाला पूर्वी कोळीवाडा नाव होते. येथे पंजाबी व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहतात.

१९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीनंतर पंजाब येथून आलेल्या हिंदूशीख निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी इथे इमारती बांधल्या होत्या. आज, ह्या इमारती मोडकळीस आल्या असून, मुंबई उच्च न्यायालयाने येथील रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचा आदेश दिला आहे.