जुलै १०
Appearance
(१० जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९१ वा किंवा लीप वर्षात १९२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५८४ - ऑरेंजच्या विल्यम पहिल्याची राहत्या महालात हत्या.
सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७७८ - अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
- १७९६ - कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- १८५० - मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९० - वायोमिंग अमेरिकेचे ४४वे राज्य झाले.
विसावे शतक
[संपादन]- १९२५ - तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
- १९२५ - उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
- १९४० - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.
- १९४७ - मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९६२ - टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६७ - न्यु झीलॅंडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.
- १९६८ - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७३ - बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३ - पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १९७६ - इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
- १९७८ - मॉरिटानियात लश्करी उठाव.
- १९९१ - बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२ - मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- २००३ - हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.
जन्म
[संपादन]- १४१९ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
- १४५२ - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १८५६ - निकोला टेसला, वैज्ञानिक.
- १८६७ - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.
- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- १९२० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९२० - आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९२५ - मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.
- १९२३ - गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
- १९४० - कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - स्कॉट स्टायरिस, न्यु झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १३८ - हेड्रियान.
- ११०३ - एरिक पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १२९८ - लाडिस्लॉस चौथा, हंगेरीचा राजा.
- १४८० - रेने पहिला, नेपल्सचा राजा.
- १५५९ - दुसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८४ - विल्यम पहिला, ऑरेंजचा राजा.
- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
- १९७० - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९७८ - जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - बहामा.
- सैन्य दिन - मॉरिटानिया.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - (जुलै महिना)