Jump to content

मिथुन (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष गोरे (चर्चा | योगदान)द्वारा ०८:२६, २ फेब्रुवारी २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
मिथुन (गयाळ)

प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी (Artiodactyla)
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बॉस
जीव: फ्राँटॅलिस
शास्त्रीय नाव
Bos frontalis
लैम्बर्ट, 1804

मिथुन किंवा गयाळ हा गोवंश या उपकुळातील एक सस्तन प्राणी आहे. हा एक पाळीव प्राणी असून आग्नेय आशियातील ईशान्य भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि चीनच्या युन्नान प्रांत इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.[]. मिथुन किंव गयाळ हा भारतातील रानगव्याचा एक वंशज असून हा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशाचा राज्य पशु आहे.[][][] अरुणाचल प्रदेशातील निशि, अपातानी, गालो व अन्य इतर समाजात हा पशु प्रतिष्ठा, संपत्ती आणि विविध प्रकारच्या धार्मिक विधीसाठी वापरला जातो. याचा उपयोग शेतीकाम, दुधदुभते, चर्मोद्योग आणि मांस यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.[][]

हा दिसण्यास रानगवा आणि गाय-बैल याचे मिश्रण असून या दोहोंच्या संकरातून याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. हा प्राणी रानगव्या प्रमाणे उंच, मजबूत आणि धडाधिप्पाड असून अगदी तसाच पाठीमागील बाजूस याचा आकार उतरता होत जातो. नर हा मादी पेक्षा अधिक उंच असून याची खांद्या जवळील उंची अंदाजे १५० सेंमी पर्यंत भरते. मिथुनचा रंग वयाप्रमाणे बदलत जातो. लहानपणी हा पिवळसर तांबडा असतो. जसजसे वय वाढत जाते, याचा रंग काळा किंवा काळपट तपकिरी होतो. याचे गुडघ्या खालील पाय पांढरे किंवा पिवळसर पांढरे असतात. शिंगांच्या मुळाशी याचे कपाळ सपाट असून शिंगांचा आकार मध्यम-आखूड असून वर जाऊन बाहेर वळलेले किंवा किंचित अर्धवर्तुळाकार असतात. बैलाप्रमाणे याच्या गळ्याला गळकंबळ किंवा पोळी असते, परंतु ठळक खांदा किंवा वशिंड नसते. जंगली पशु प्रमाणे याची वास घेण्याची क्षमता चांगली असते. हा जरी पाळीव प्राणी असला तरी प्राथमिक प्रशिक्षणाशिवाय याला हाताळता येत नाही. तसेच याला चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. []

चित्र दालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "गयाळ". २४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Mithun, the state animal of Nagaland and Arunachal Pradesh, might graze outside north eastern states" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "अरुणाचल प्रदेश मैप" (हिंदी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "नागालैंड का नक्शा" (हिंदी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Mithun Mela at Ledum village Arunachal Pradesh". २४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ Simoons, F. J. (1984). Gayal or mithan. In: Mason, I. L. (ed.) Evolution of Domesticated Animals. Longman, London. Pages 34–38.