Jump to content

अनुदिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
blog (es); Blogg (is); Blog (ms); Блог (os); blog (en-gb); Blog (tr); بلاگ (ur); blog (sk); blòg (oc); Blog (tk); 博客 (zh-cn); Blog (uz); Блог (kk); блог (mk); Blog (bs); ब्लॉग (bho); blogue (fr); Blog (hr); अनुदिनी (mr); وبلاگ (glk); блог (sr); Blog (lb); blogg (nb); Bloq (az); 博客 (lzh); blogi (smn); مدونة (ar); Blog (br); 網誌 (yue); bitakora (krj); Akalio'ushajülee (guc); blogue (ast); blog (ca); Blog (de-ch); blog (cy); blog (lmo); blag (ga); блог (sr-ec); 網誌 (zh); blog (da); ბლოგი (ka); ブログ (ja); Blog (ia); වියුණු සටහන (si); commentāriī interrētiālis (la); चिट्ठा (hi); 博客 (wuu); blogi (fi); Waibe-blok (wa); blog (en-ca); blogg (sms); வலைப்பதிவு (ta); Bolog (dtp); блог (be-tarask); блог (tt-cyrl); Blog (scn); bitakora (pag); บล็อก (th); Blog (sh); blòg (vec); bitakora (bcl); Блог (bg); blog (ro); 網誌 (zh-hk); Buluug (teknooloji) (so); blogg (sv); 部落格 (zh-hant); Blogo (io); ບລັອກ (lo); 블로그 (ko); Bloggur (fo); blogo (eo); blog (an); ব্লগ (bn); Uōng-cé (cdo); Blog (jv); 部落格 (zh-my); בלאג (yi); blog (hsb); Blog (vi); ბლოგი (xmf); bitakora (ilo); blog (pt-br); blog (sco); Блог (mn); Bāng-chì (nan); ಬ್ಲಾಗ್ (kn); بلۆگ (ckb); blog (en); ߓߑߟߏߜ߭ߍߙ (nqo); blog (hu); બ્લૉગ (gu); blog (eu); bitakora (hil); блог (ru); Blog (de); блог (be); Blog (ku); ब्लग (ne); Blogu (sw); ιστολόγιο (el); Ditari Blog (sq); Blog (st); Blog (ie); בלוג (he); блог (tt); Webloch (fy); ប្លូក (km); బ్లాగు (te); Blogue (mwl); وب‌نوشت (fa); Blog (su); blogg (nn); weblog (nl); blog (it); блогер (mhr); ব্লগ (as); blog (id); ajaveeb (et); Blog (mg); blog (af); ਬਲਾਗ (pa); блог (uk); блог (tg); bitakora (ceb); blogue (pt); blogg (mt); Blog (tet); blog (cs); tinklaraštis (lt); blog (sl); Blog (tl); блог (ba); Blog (bar); Blog (war); blog (pl); ബ്ലോഗ് (ml); 部落格 (zh-tw); bitákora (pam); tīmekļa žurnāls (lv); blogga (se); rangitaki (mi); blog (gl); Բլոգ (hy); 博客 (zh-hans); чурали (udm) sitio web periódicamente actualizado que recopila cronológicamente textos o artículos de uno o varios autores (es); a világhálón közzétett vita- vagy információs oldal (hu); дневник, ведущийся в интернете, обычно публичный (ru); даими рәүештә билдәле ваҡыт айырмаһы менән өҫтәлә барған яҙмалар: текст, рәсем, видео йәки башҡа мультимедиа мәғлүмәте (ba); auf einer Website geführtes Tagebuch (de); وب نوشت (fa); 線上日記型式的個人網站 (zh); webdagbog (da); günlüğe benzeyen web siteleri (tr); World Wide Web上のウェブページに、覚え書きや論評などを記すウェブサイト (ja); Diario digital directe (ia); webbdagbok (sv); יומן רשת (he); 博客、網絡日誌 (zh-hant); इंटरनेट पर प्रकाशित चर्चा या सूचनात्मक साइट (hi); 인터넷에 정보성 혹은 의견교환성 글을 게시하기 위한 웹사이트 (ko); speco de retejo (eo); diskusní nebo informační web zveřejněný na webu (cs); இணையத்தில் ( www )பதிவேற்றம் செய்யப்படும் தகவல் நிறைந்த ஒரு இணையதளம் ( website ). (ta); tipo di sito web (it); অনলাইন ব্যক্তিগত দিনলিপি (bn); site web personnel d'information ou de discussion publié sur le World Wide Web (fr); veebileht (tavaliselt ühe) autori päevikulaadsete perioodiliste sissekannetega (et); discussion or informational website consisting of discrete, often informal diary-style text entries (posts) (en); na webstronje wjedźeny dźenik (hsb); dạng nhật ký trực tuyến (vi); sítio autoral que publica periodicamente informações ou discussões na Internet (pt); дискусија или информативна веб локација која се састоји од дискретних, често неформалних текстуалних уноса (постова) у стилу дневника (sr); ενημερωτικός ιστότοπος αποτελούμενος από διακριτές, συχνά ανεπίσημες εγγραφές κειμένου (αναρτήσεις) (el); дискусија или информативна веб локација која се састоји од дискретних, често неформалних текстуалних уноса (постова) у стилу дневника (sr-ec); site autoral que publica periodicamente informações ou discussões na Internet (pt-br); discussion or informational website consisting of discrete, often informal diary-style text entries (posts) (en); situs diskusi atau informasi di Jejaring Jagat Jembar (id); strona o tematyce publicystycznej lub informacyjnej umieszczona w sieci WWW (pl); കുറിപ്പുകളോ ചെറുലേഖനങ്ങളോ ഉൾക്കൊള്ളുന്ന ദിനസരി കുറിപ്പുകൾ (ml); actuele internetsite waarop regelmatig korte stukjes, foto's, filmpjes enz. verschijnen, al dan niet uit de persoonlijke sfeer (nl); boltayev shahzod (uz); tipus particular de lloc web (ca); personlig nettside og digital dagbok (nb); Diskussiouns- oder Informatiounssäit um Internet (lb); páxina web con textos ordenados cronoloxicamente escritas por unha ou varias persoas (gl); موقع إلكتروني يجمع عدد من التدوينات وهي بمثابة مفكرة أو ساحة طرح آراء شخصية. (ar); sito internet (vec); вебсайт, що складається з окремих, часто неформальних текстових записів у стилі щоденника (uk) weblog, weblogs, bitácora web (es); Weblog, Bloggari, Blog (is); blog (bcl); Weblog (ro); مدونی, Blogger, مدونین, Bloggers, بلاگز, مدونات, Blog, نوشتۂ جال (ur); Webbdagbok, Weblog, Webbkrönika, Weblogg, Webbloggen, Musikblogg, Bloggsökmotorer, Bloggning, Webloggen, Webloggar, Webblogg, Bloggar, Webbjournal, Bloggande, Webbloggar, Flog, Blogga, Affärsblogg, Bloggen, Blog (sv); blog, web blog, bitacòla (oc); ເວັບບລັອກ (lo); 미지센터, 블로깅, 웨브로그, Blog, 웹블로그, 웹 로그, 누리사랑방, 웹로그 (ko); Weblog, Bloggari, Blogs, Weblogs, Blog, Blogging (fo); rettaglibro, reta taglibro, retotaglibro (eo); weblog (cs); Weblog (bar); webjournal, weblog, joueb, cybercarnet, blog (fr); Weblog, Mrežopis (hr); בלאָג, בלאגערס, בלאגס, בלאגספערע (yi); ब्लॉग, जालनिशी (mr); weblog, blogy (hsb); Weblog, Web log, Webblog (vi); emuārs, blogs (lv); weblog, webjoernaal (af); Веблог (sr); weblog, web log, blogue (pt-br); Blog (nan); Weblogg, Vebblogg, Blog, Weblog, Vevlogg, Nettlogg, Nettblogg, Mikroblogg (nb); Blog (az); بڵۆگ, بلاگ, وێبلۆگ (ckb); web log, blogs, weblog (en); بلوغ (ar); weblog, webnapló, web log, mikroblog (hu); blog (krj); Weblog, Bloga (eu); blog (hil); сетевой журнал, онлайн-дневники, блоги, интернет-дневник, блогинг, веблог, блоггинг (ru); Weblog, Web-Logbuch, Web-Log, Online-Tagebuch, Nanopublishing, MetaBlogging, Watchdog blog, Web log, Meta-Blogging, Blogging, Affiliate Blog, Blawg, Bloggen, Blogroll (de); blog (pam); веблог (sr-ec); 網上日記, 网志, 部落阁, 网络日志, 协客, 網絡日記, 部落格, 博客, 網路日誌 (zh); Bloch (fy); 部録, Weblog, 身辺雑記, インターネットブログ, ウェブログ, ブロッガー, BLOG, ネットブログ, Vlog, ヴログ (ja); Blogero (ia); බ්ලොග් (si); Blogis (la); блоґ (be-tarask); ब्लॉग, चिट्ठाकारी, ब्लॉगिंग, चिट्ठाकारिता (hi); తెలుగు బ్లాగర్లు (te); verkkopäiväkirja, blog (fi); Blog (wa); weblog, μπλογκ, blog (el); Weblog, Blogosfera (bs); வலைமனை, வலைப்பூக்கள், வலைப்பூ (ta); weblog, multiblog, nanopublishing (it); weblog, designblog, nanopublicering, weblogs, nanopublisering, filmblog (da); בלוג קהילתי, יומן רשת, בלוג אקדמי, בלוגוספירה (he); Weblog (sh); Kajam, veebipäevik, blogi, blog (et); weblog (sk); blog, bloglar, блоглар (tt-cyrl); Weblog, Web log, Blogging, catatan web (id); બ્લોગ (gu); blog (ilo); Vlogg, Weblog, Weblogg (nn); Weblog, Post, Web log, Blogues, Blogs, Blogar, Blog (pt); Blog (mt); เว็บบล็อก, Weblog, บล๊อค, เว็บล็อก, บล๊อก, เว็บบลอค, Blog, บลอก (th); Weblog, Diari personal interactiu, Bitàcola, Blocs, Blogs, Blocaire, Bloguisme, Blogaire, Bloc (ca); Weblog, Blogeris, Interneto dienoraštis, Blogas, Tinklaraštininkas, Weblogas, Blog, Tinklaraščiai, Internetinis dienoraštis (lt); Spletni dnevnik, Spletnik, Spletopis (sl); Weblog, Tagablog, Web log, Blogero, Blogera, Nakapag-blog, Web-log, Taga-blog, Nakapagblog, Anu ang blog? (tl); Gweflog (cy); blog (pag); blog (ceb); weblog (pl); Blog (ml); fotolog, weblogs, muzilog, weblogger, web-log, blogs, linklog, linkdumper, bloggen, blog, lifelog (nl); blog (ast); blog, bloglar, блоглар (tt); Weblog, Blog (sq); بلاگ, وب‌لاگ, وب لاگ, وبلاگ های فارسی, تارنگار, وب‌نگار, وبلاگ نویسی, وبنگار, وبلاگ‌های فارسی, وب نوشت, وبنوشت, وبلاگ, وب نگار (fa); blogue (gl); Weblog, Kişisel günce, Sanal günlük, Blogir, Bloger, Bilogır, Web günlüğü, Kişisel blog, Ağ güncesi, Bloggır, Bloggir, Ağ günlüğü, Blogır (tr); 部落格 (zh-hans); веблог, блоґ (uk)
अनुदिनी 
discussion or informational website consisting of discrete, often informal diary-style text entries (posts)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उपवर्गसंकेतस्थळ,
periodical (circa),
सामाजिक माध्यमे,
digital-native publication
ह्याचा भागमहाजाल
भाग
  • blog post (often)
उत्पादक
पासून वेगळे आहे
  • Blob
  • vlog
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा आंतरजाल आणि नोंद या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. एकप्रकारे जालपत्रिका म्हणजे वैयक्तिक/सामूहिक/सांस्थिक स्वरूपातील मते/विषय/बातम्या वा इतर कोणत्याही विषयावरील जालपान (WebPage) होय. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार टाकलेल्या असतात. जालपत्रिकेच्या संपादकास अनुदिनी लेखक किंवा जालपत्रले़खक (इंग्रजीत bloggers) म्हणतात.

काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "विजेट्स"[] द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बऱ्याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बऱ्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.

टेक्नोरती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्जवर नजर ठेवून होते.

ब्लॉगचे प्रकार

वैयक्तिक ब्लॉग

एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर तिच्या आवडीनुसार जेव्हा मजकूर प्रसिद्ध करते, तेव्हा तो वैयक्तिक ब्लॉग असतो. हा ब्लॉग कसा असावा किंवा कसा आकर्षक करावा ही पूर्णतः त्याची इच्छा असते. वैयक्तिक ब्लॉगवर सातत्याने किंवा गरजेनुसार लेखन करता येते.

सहयोगी ब्लॉग

जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉग म्हणतात. अनेक विषयांचे एकत्रीकरण यात वाचायला मिळते.

मायक्रोब्लाॅगिंग

डिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रोब्लाॅगिंग उपयोग होतो. लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे काही वेळा फार गरजेचे असते. उदा., मीटिंग, निवडणूक प्रचार, पुस्तकांचा संदर्भ इत्यादी.

संस्थात्मक ब्लॉग

खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो. आपल्या कामासंबंधी अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी या ब्लॉगचे महत्त्व आहे.

इतिहास

अनुदिनी ची सुरुवात १९९४ पासून झाली .जस्टिन हॉल हा पहिला आद्य ब्लॉगर होता .वेबब्लॉग ह्या शब्दाचे जनक जॉर्न बारजर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ ला बनवला. ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जबाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी हा शब्द पीटरमी.कॉम च्या साइडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्या काळात ईव्हान विल्यम ह्यांनी पायरा लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही प्रकारे वापरला ( टु ब्लॉग म्हणजे एका वेबलॉगमध्ये बदल करणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दही पायरा लॅब्जने एक ब्लॉगर प्रॉडक्ट म्हणून तयार केला. हे शब्द आता चांगलेच रूढ झाले आहेत.

लोकप्रियतेमध्ये वाढ

एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर ब्लॉग्ज बनवण्यासाठी आणि ब्लॉग्जमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे (Blog Tools) ब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.

  • ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायऱ्या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
  • ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
  • अ‍ॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणाऱ्या समुदायाकडेच होता.
  • ईव्हान विल्यम आणि मेग हॉरिहान ह्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये ब्लॉगर.कॉम ची स्थापना केली. (हे संकेतस्थळ २००३ मध्ये गुगल कंपनीने खरेदी केले.)

मराठी भाषेतील ब्लॉग

इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णतः बदलले. माध्यमे, विशेषतः वृत्तपत्रे व्यावसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यावसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. तसेच ब्लॉगिंग शिकणाऱ्यांसाठीही इथे मराठी भाषेत ब्लॉग उपलब्ध आहे.

पुस्तक

अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे दिलीप प्रभावळकर यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका निघाली होती.

बाह्य दुवे

संदर्भ