अब्राहम
Appearance
अब्राहम किंवा इब्राहिम (हिब्रू: אַבְרָהָם ; अरबी: إبراهيم, ग्रीक: Aβραάμ) हा एक प्रागैतिहासिक हिब्रू प्रेषित होता ज्याला ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम ह्या तीन धर्मांचा निर्माणकर्ता व जनक (किंवा श्रद्धेचा आदिपिता) मानले जाते. हिब्रू बायबल व कुराणानुसार ह्या धर्मांमधील अनेक उपधर्म व विचारधारांचा अब्राहम हा पिता होता. ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताला तर मुस्लिम लोक मोहम्मद पैगंबराला अब्राहमचा वंशज मानतात.
इ.स. पूर्व दुसऱ्या सहस्रकामध्ये कार्यरत असणाऱ्या अब्राहमचा जन्म मेसोपोटेमिया येथे झाला असे मानले जाते. बूक ऑफ जेनेसिसमध्ये अब्राहमचे जीवनचरित्र रंगवले आहे. कुराणातील काही कथा देखील सारख्याच स्वरूपाच्या आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत