अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी
Appearance
अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी (१४ एप्रिल, इ.स. १८८९ - २२ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हा विसाव्या शतकातील एक इतिहासतज्ञ व तत्त्वज्ञ होता. जगातील विविध संस्कृतींचा उदय, विकास आणि ऱ्हास यांचा मागोवा घेणारी 'ए स्टडी ऑफ हिस्टरी' ही बारा खंडांची ग्रंथमाला त्याने लिहिली.[१]
परिचय
[संपादन]टॉयन्बी याचा जन्म लंडन येथे १४ एप्रिल, इ.स. १८८९ रोजी झाला. ऑक्सफर्डमधील 'हॅलियल कॉलेज' व ग्रीसमधील 'ब्रिटिश आर्किऑलॉजिकल स्कूल'मधून शिक्षण घेतल्यावर लंडन विद्यापीठात त्याने प्राध्यापक म्हणून काम केले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Arnold Toynbee. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)