Jump to content

इरावती कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरावती कर्वे
जन्म नाव इरावती कर्वे
जन्म डिसेंबर १५, १९०५
मिंज्यान, म्यानमार
मृत्यू ऑगस्ट ११, १९७०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन,संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित, वैचारिक
प्रसिद्ध साहित्यकृती युगान्त
पती दि.धों.कर्वे
अपत्ये जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ.आनंद कर्वे
विकिस्रोत
विकिस्रोत
इरावती कर्वे हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

इरावती कर्वे ( डिसेंबर १५, १९०५,म्यानमार - मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०) या मराठी लेखिका होत.[]मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.नातेसंबंधांबद्दल योगदान दिले.

शिक्षण

[संपादन]

इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.

कौटुंबिक

[संपादन]

इरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे डिसेंबर १५, १९०५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. दि.धों.कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]

इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-

समीक्षा ग्रंथ

[संपादन]
  • युगान्त १९७१ : महाभारतावरील समीक्षा ग्रंथ.

ललित लेखसंग्रह

[संपादन]

समाजशास्त्रीय ग्रंथ

[संपादन]

याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

पुरस्कार

[संपादन]

युगान्त या पुस्तकाला १९७२चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.

इतर मान्यवरांचे विचार

[संपादन]

"जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि व नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावती कर्व्यांना लाभले आहे. ही धडपड त्यांनी एकाकीपणे केली आहे. नव्या लघुनिबंधाच्या उगमापाशी त्या उभ्या आहेत." असे इरावती कर्वे यांबद्दल डॉ.आनंद यादव म्हणतात तर 'ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य अभिव्यक्त करणाऱ्या, नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत' असे प्रा.नरहर कुरुंदकरांनी संबोधले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ जोगळेकर, प्रमोद. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्ताहिक विवेक (हिंन्दुस्तान प्रकशन संस्था).