Jump to content

जेसिका टँडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jessica Tandy (es); Jessica Tandy (co); 洁西卡·坦迪 (zh-hans); Jessica Tandy (ms); Τζέσικα Τάντι (el); Jessica Tandy (nl); Jessica Tandy (af); Jessica Tandy (en-gb); 潔西卡·坦迪 (zh-tw); Джесика Тенди (bg); Jessica Tandy (pcd); Jessica Tandy (ro); Jessica Tandy (kg); 제시카 탠디 (ko); Jessica Tandy (mg); Jessica Tandyová (sk); Jessica Tandy (pt); Jessica Tandy (oc); 潔西卡·坦迪 (zh-hk); Ҷессича Тандй (tg); 杰茜卡·坦迪 (zh-cn); Jessica Tandy (gsw); Jessica Tandy (uz); Jessica Tandy (sh); Jessica Tandy (eo); Jessica Tandy (cs); Jessica Tandy (bar); Jessica Tandy (an); জেসিকা ট্যান্ডি (bn); Jessica Tandy (fr); Jessica Tandy (gd); Jessica Tandy (hr); Jessica Tandy (pl); Jessica Tandy (id); Jessica Tandy (tr); Џесика Танди (sr-ec); जेसिका टँडी (mr); 潔西卡·坦迪 (zh-hant); Jessica Tandy (vi); Jessica Tandy (prg); Jessica Tandy (lv); Jessica Tandy (frp); Џесика Танди (sr); Jessica Tandy (zu); Jessica Tandy (lt); Jessica Tandy (pt-br); 洁西卡·坦迪 (zh-sg); Jessica Tandy (lb); Jessica Tandy (nn); Jessica Tandy (nb); Jessica Tandy (io); Jessica Tandy (min); Jessica Tandy (hu); Jessica Tandy (pap); جێسیکا تاندی (ckb); Jessica Tandy (en); جيسيكا تاندي (ar); Jessica Tandy (br); Джэсіка Тэндзі (be); جسیکا تندی (fa); Jessica Tandy (da); Jessica Tandy (bm); Jessica Tandy (ga); Jessica Tandy (sv); Jessica Tandy (eu); Jessica Tandy (ia); Jessica Tandy (ast); جسیکا تندی (azb); Jessica Tandy (de-ch); Jessica Tandy (de); Jessica Tandy (jam); Jessica Tandy (sq); Ջեսիկա Տենդի (hy); 潔西卡·坦迪 (zh); Jessica Tandy (dag); ჯესიკა ტენდი (ka); ジェシカ・タンディ (ja); Jessica Tandy (rm); Jessica Tandy (nrm); جيسيكا تاندى (arz); Jessica Tandy (ie); ג'סיקה טנדי (he); Jessica Tandy (et); Джессіка Тенді (uk); Jessica Tandy (frc); Jessica Tandy (li); Jessica Tandy (fi); Jessica Tandy (wa); Jessica Tandy (pms); เจสซิกา แทนดี้ (th); Çessica Tandj (tg-latn); Jessica Tandy (it); Jessica Tandy (en-ca); Jessica Tandy (vls); Джессика Тэнди (ru); Джэсыка Тэндзі (be-tarask); Jessica Tandy (nap); Jessica Tandy (nds); Jessica Tandy (nds-nl); Jessica Tandy (de-at); Jessica Tandy (yo); Jessica Tandy (scn); Džesika Tandi (sr-el); Jessica Tandy (vo); Jessica Tandy (cy); Jessica Tandy (ca); Jessica Tandy (wo); Jessica Tandy (sl); Jessica Tandy (tl); Jessica Tandy (sc); जेसिका टैंडी (mai); Jessica Tandy (fur); Jessica Tandy (sw); ജെസ്സി ടാണ്ടി (ml); Jessica Tandy (kab); Jessica Tandy (rgn); جیسیکا ٹینڈی (ur); Jessica Tandy (lij); Jessica Tandy (vmf); Jessica Tandy (gl); ჯესიკა ტენდი (xmf); Jessica Tandy (vec); Jessica Tandy (ilo) actriz estadounidense (es); ব্রিটিশ অভিনেত্রী (bn); actrice britannique (fr); britisk skuespiller (nb); americká herečka (cs); britisk skuespiller (1909-1994) (da); Oscar-díjas angol színésznő (hu); 영국, 미국의 배우 (1909–1994) (ko); actriu anglesa nacionalitzada estatunidenca (ca); British actress (1909–1994) (en); britische Schauspielerin (1909–1994) (de); attrice inglese (it); ban-aisteoir Briotanach-Meiriceánach (1909-1994) (ga); بازیگر بریتانیایی (fa); Briton-Amerikana nga aktres (ilo); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); İngiliz-Amerikalı sinema oyuncusu (1909 – 1994) (tr); イギリスの女優 (1909-1994) (ja); aktorka amerykańska pochodzenia brytyjskiego (pl); Aktris Inggris-Amerika (id); brittesch Schauspillerin (lb); britisk skodespelar (nn); Англійська акторка (uk); Brits actrice (nl); שחקנית קולנוע ותיאטרון בריטית-אמריקנית (he); brittisk skådespelare (sv); ممثله افلام من المملكه المتحده (arz); brittiläinen näyttelijä (1909 - 1994) (fi); British actress (1909–1994) (en); ممثلة أفلام أمريكية (ar); ΆγγλοΑμερικανίδα ηθοποιός (1909-1994) (el); actores (cy) Jessie Alice Tandy (it); Jessie Tandy (ast); Тэнди Джессика, Джессика Тенди, Jessica Tandy, Тэнди Д., Тэнди, Джессика (ru); Jessica Alice Tandy (de); Джесика Танди (bg); Jessica Tandy (sr); Jessie Alice Tandy (tr); Jessie Alice Tandy (id); Džesika Tendi, Džesika Tandi, Jessie Alice Tandy (sh); Jessie Alice Tandy (ilo); Jessica Tandy (th); Jessica Alice Tandy (ro); Jessica Alice Tandy (gl); Jessie Alice Tandy (en); Jessica Tandy (ar); Jessica Alice Tandy, Jessica Dandy (cs); Tandy (sv)
जेसिका टँडी 
British actress (1909–1994)
Portrait aus den 1950er Joren
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून ७, इ.स. १९०९
लंडन
Jessica Alice Tandy
मृत्यू तारीखसप्टेंबर ११, इ.स. १९९४
फेरफील्ड काउंटी
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९२६
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Dame Alice Owen's School
व्यवसाय
अपत्य
  • Tandy Cronyn
वैवाहिक जोडीदार
  • Hume Cronyn (इ.स. १९४२ – इ.स. १९९४)
  • Jack Hawkins (इ.स. १९३२ – इ.स. १९४०)
पुरस्कार
  • National Medal of Arts
  • Academy Award for Best Actress (इ.स. १९९०)
  • Tony Award for Best Actress in a Play (इ.स. १९४८)
  • Tony Award for Best Actress in a Play (इ.स. १९७८)
  • Tony Award for Best Actress in a Play (इ.स. १९८३)
  • Kennedy Center Honors
  • Crystal Award (इ.स. १९९१)
  • BAFTA Award for Best Actress in a Leading Role (इ.स. १९९१)
  • Primetime Emmy Award for Outstanding Lead Actress in a Miniseries or a Movie (इ.स. १९८८)
  • star on Hollywood Walk of Fame
  • Drama Desk Award for Outstanding Actress in a Play
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q182104
आयएसएनआय ओळखण: 0000000063020069
व्हीआयएएफ ओळखण: 37103558
जीएनडी ओळखण: 119048779
एलसीसीएन ओळखण: n84215003
बीएनएफ ओळखण: 13900281h
एसयूडीओसी ओळखण: 060312211
NACSIS-CAT author ID: DA10899871
आय.एम.डी.बी. दुवा: nm0001788
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 36528409
एनकेसी ओळखण: xx0184336
बीएनई ओळखण: XX1167629
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 072522135
बीआयबीएसआयएस ओळखण: 99013461
NUKAT ID: n2013191406
Internet Broadway Database person ID: 68863
Oxford Dictionary of National Biography ID: 55776
NLP ID (old): a0000002116346
National Library of Korea ID: KAC2020K9424
Playbill person ID: jessica-tandy-vault-0000042485
PLWABN ID: 9810531339105606
J9U ID: 987007342212905171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जेसी ॲलिस टँडी (७ जून १९०९ - ११ सप्टेंबर १९९४) एक इंग्लिश अभिनेत्री होती. टँडी १०० हून अधिक नाटकांमध्ये दिसली आणि चित्रपट आणि टीव्हीमध्ये ६० हून अधिक भूमिका केल्या आहेत. त्यांना एक अकादमी पुरस्कार, चार टोनी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला. तिने १९४८ मधील अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायरच्या मूळ ब्रॉडवे नाटकामध्ये ब्लँचे डुबोईसची भूमिका केली होती व नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तसेच द जिन गेम आणि फॉक्सफायरसाठी देखील तिने हा पुरस्कार जिंकला. तिच्या चित्रपटांमध्ये अल्फ्रेड हिचकॉकचे द बर्ड्स, ककून, फ्राइड ग्रीन टोमॅटो आणि नोबडीज फूल यांचा समावेश होता. ८० व्या वर्षी, ड्रायव्हिंग मिस डेझी मधील तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार प्राप्त करणारी ती सर्वात वयस्कर अभिनेत्री बनली.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

तीन भावंडांपैकी सर्वात लहान, टँडीचा जन्म हॅकनी, लंडनमधील गेल्डेस्टन रोड येथे हॅरी टँडी आणि त्याची पत्नी जेसी हेलन हॉर्सपूल यांच्या घरी झाला.[] तिची आई विस्बेच, केंब्रिजशायर येथील एका मोठ्या फेनलँड कुटुंबातील होती आणि मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या शाळेची प्रमुख होती. तिचे वडील दोरीच्या निर्मात्यासाठी प्रवासी सेल्समन होते.[] तिचे शिक्षण इसलिंग्टन येथील डेम ॲलिस ओवेन स्कूलमध्ये झाले.

ती १२ वर्षांची असताना तिचे वडील वारले आणि त्यानंतर तिच्या आईने उत्पन्न मिळविण्यासाठी संध्याकाळी अभ्यासक्रम शिकवणे सुरू केले. तिचा भाऊ एडवर्ड नंतर जपानमध्ये युद्धाचा कैदी होता.[]

अभिनय कारकीर्द

[संपादन]
टँडी (डावीकडे, किम हंटर आणि मार्लन ब्रँडो) हे मूळ १९४७ च्या ब्रॉडवे नाटकाच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायरमध्ये दिसतात. ह्या भूमिकेमुळे तिला १९४८ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला होता.

१९२७ मध्ये लंडनच्या मंचावर तिने व्यावसायिक पदार्पण केले तेव्हा टँडी १८ वर्षांची होती. १९३० च्या दशकात, तिने लंडनच्या वेस्ट एंडमधील अनेक प्रयोगांमध्ये हॅम्लेट मध्ये ओफेलिया आणि हेन्री पाचवा मध्ये राणी कॅथरीनच्या भूमिका केल्या होत्या.[]

तिने ब्रिटनमधील चित्रपटांमध्ये प्रवेश केला, परंतु जॅक हॉकिन्सशी तिचे लग्न अयशस्वी झाल्यानंतर, ती अधिक चांगल्या भूमिका शोधण्याच्या आशेने अमेरिकेला गेली.[] त्यानंतरच्या काही वर्षांत तिने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या.

अनेक रंगमंचावरील अभिनेत्यांप्रमाणे, टँडीने रेडिओमध्येही काम केले. इतर कार्यक्रमांपैकी, ती मॅन्ड्रेक द मॅजिशियन [] (राजकुमारी नारदा म्हणून) वर नियमित होती आणि त्यानंतर १९५३-५४ मध्ये द मॅरेज [] मध्ये तिचा दुसरा पती ह्यूम क्रोनिन सोबत.

तिने द सेव्हन्थ क्रॉस (१९४४) मधून अमेरिकन चित्रपटात पदार्पण केले. द व्हॅली ऑफ डिसिजन (१९४५), द ग्रीन यीअर्स (१९४६), ड्रॅगनविक (१९४६), आणि फॉरएव्हर ॲबर (१९४७) या चित्रपटांमध्ये तिने सहायक भूमिका केल्या होत्या. ए वुमन्स व्हेंजेन्स (१९४८) मध्ये ती निद्रानाश खुनी म्हणून दिसली, जो अल्डॉस हक्सलीने त्याच्या "द जिओकोंडा स्माईल" या लघुकथेतून रुपांतरित केलेला चित्रपट होता .

पुढील तीन दशकांत, तिची चित्रपट कारकीर्द तुरळकपणे चालू राहिली आणि तिला रंगमंचावर चांगल्या भूमिका मिळाल्या. या काळातील तिच्या भूमिकांमध्ये जेम्स मेसनसोबत द डेझर्ट फॉक्स: द स्टोरी ऑफ रोमेल (१९५१), द लाइट इन द फॉरेस्ट (१९५८) आणि अल्फ्रेड हिचकॉकच्या द बर्ड्स (१९६३) चित्रपटातील दबंग आईच्या भूमिकेचा समावेश होता.

१९७६ मध्ये, ती आणि क्रोनिन स्ट्रॅटफोर्ड फेस्टिव्हलच्या अभिनय कंपनीत सामील झाले आणि १९८० मध्ये क्रोनिनच्या फॉक्सफायर नाटकात पदार्पण करण्यासाठी परतले.[][] १९७७ मध्ये, तिने द जिन गेममधील तिच्या कामगिरीसाठी तिचा दुसरा टोनी पुरस्कार मिळवला आणि १९८२ मध्ये तिसरा टोनी, फॉक्सफायरमध्ये कामगिरीसाठी.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीस तिच्या चित्रपट कारकिर्दीचे पुनरुत्थान झाले, द वर्ल्ड ॲडॉर्ड टू गार्प (१९८२), बेस्ट फ्रेंड्स (१९८२), स्टिल ऑफ द नाईट (१९८२) आणि द बोस्टोनियन्स (१९८४) मधील भूमिकांसोबत. हॉन्की टोंक फ्रीवे (१९८१), ककून (१९८५), *बॅटरीज नॉट इन्क्लुड (१९८७), ककून: द रिटर्न (१९८८), आणि एमी पुरस्कार विजेते चित्रपटांसह फॉक्सफायर (१९८७), हे तिचे महत्त्वाचे कामे होती.

तथापि, ड्रायव्हिंग मिस डेझी (१९८९) मधील तिच्या रंगीबेरंगी कामगिरीने एक वृद्ध, जिद्दी दक्षिणी ज्यू मॅट्रॉन म्हणून तिला ऑस्कर मिळवून दिला.[१०]

फ्राइड ग्रीन टोमॅटोज (१९९१) मधील तिच्या कामासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले. वयाच्या ८४ व्या वर्षी नोबडीज फूल (१९९४) ही तिची शेवटची कामगिरी ठरली.

वैयक्तिक जीवन आणि मृत्यू

[संपादन]
टँडी आणि ह्यूम क्रोनिन, 1988

१९३२ मध्ये टँडीने इंग्लिश अभिनेता जॅक हॉकिन्सशी लग्न केले आणि त्यांना सुसान हॉकिन्स ही मुलगी झाली.[११][१२]

टँडी आणि हॉकिन्स यांचा १९४० मध्ये घटस्फोट झाला. तिने १९४२ मध्ये कॅनेडियन अभिनेता ह्यूम क्रोनिनशी लग्न केले.[११] कनेक्टिकटला जाण्यापूर्वी, ती आणि क्रोनिन न्यू यॉर्कमध्ये बरीच वर्षे राहिली आणि १९९४ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत ते एकत्र राहिले. त्यांना दोन मुले होती, मुलगी टँडी क्रोनिन, एक अभिनेत्री जी तिच्या आईसोबत टीव्ही चित्रपट द स्टोरी लेडीमध्ये सहकलाकार करणार होती आणि मुलगा क्रिस्टोफर क्रोनिन. जेसिका टँडी १९५२ मध्ये अमेरिकेची नैसर्गिक नागरिक बनली.

१९९० मध्ये, जेसिका टँडीला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि तिला एनजाइना आणि काचबिंदूचाही त्रास झाला. तिचे आजारपण आणि वाढत्या वयानंतरही तिने काम चालू ठेवले. ११ सप्टेंबर १९९४ रोजी, वयाच्या ८५ व्या वर्षी ईस्टन, कनेक्टिकट येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले.[१३][१४][१५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jessica Tandy's family to unveil plaque to commemorate star's Hackney birthplace 19 November 1998[permanent dead link]; accessed 10 May 2007
  2. ^ "The Academy Awards: A Look At Jessica Tandy". Oxford University Press. February 2007.
  3. ^ Kelly, Terence (1977). Living with Japanese. Kellan Press. p. 136. ISBN 978-0-9530-1930-4.
  4. ^ {{स्रोत बातमी|last=Berger|first=Marilyn|url=https://www.nytimes.com/learning/general/onthisday/bday/0607.html%7Ctitle=Jessica Tandy, a Patrician Star Of Theater and Film, Dies at 85|date=12 September 1994|work=[[The न्यू यॉर्क टाइम्स|author-link=Marilyn Berger|access-date=12 June 2012|url-access=subscription}}
  5. ^ "At Home with Cronyn and Tandy". The New York Times. May 26, 1994. 12 September 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Cronyn, Hume (1991). Terrible Liar: A Memoir. New York: William Morrow. p. 159. ISBN 978-0-6881-2844-9.
  7. ^ Cronyn 1991.
  8. ^ "Jessica Tandy acting credits". Stratford Festival Archives. 31 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2019 रोजी पाहिले.
  9. ^ Blackadar, Bruce (10 May 1980). "Hume Cronyn turns playwright with Foxfire". Toronto Star. p. F1.
  10. ^ "Miss Daisy, Jessica Tandy Win Top Oscars". Chicago Tribune. 27 March 1990. 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 November 2010 रोजी पाहिले.
  11. ^ a b Champlin, Charles (June 18, 1995). "Life After Jessie: For 52 years, Hume Cronyn and Jessica Tandy shared the love story of the century. Her death last year devastated him, but his love lives on". Los Angeles Times. November 10, 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "John Tettemer". American Film Institute Catalog. 5 May 2018 रोजी पाहिले.
  13. ^ Berger, Marilyn. "Jessica Tandy, a Patrician Star Of Theater and Film, Dies at 85". The New York Times. 11 June 2019 रोजी पाहिले.
  14. ^ Shipman, David (12 September 1994). "Obituary: Jessica Tandy". London. 8 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 June 2019 रोजी पाहिले.
  15. ^ "From the Archives: Jessica Tandy, Star of Stage, Screen and TV, Dies at 85". Los Angeles Times. 12 September 1994. 11 June 2019 रोजी पाहिले.