झांझिबार
झांझिबार Zanzibar | ||
टांझानियाचा स्वायत्त प्रदेश | ||
| ||
झांझिबारचे टांझानिया देशामधील स्थान | ||
देश | टांझानिया | |
राजधानी | झांझिबार शहर | |
क्षेत्रफळ | २,६४३ चौ. किमी (१,०२० चौ. मैल) | |
लोकसंख्या | १०,७०,००० |
झांझिबार (उच्चार:zænzɨbɑr;फारसी:زنگبار - झंगीबार/जंगीबार, गंजलेला किनारा;अरबी:زنجبار - झंजिबार)हा पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश हिंदी महासागरातील टांझानियाच्या किनाऱ्यापासून २५-५० किमी दूर झांझिबार द्वीपकल्पावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला कोमोरोस व मायोत, आग्नेयेला मॉरिशस व रेयूनियों व पूर्वेला सेशेल्स ही बेटे आहेत.
इतिहास
[संपादन]येथील गुलाम, लवंग, दालचिनी, मिरे इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीज व अरब शोधक येथे शोध युगादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात ब्रिटिश साम्राज्याने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने टांझानियामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
बाह्य दुवे
[संपादन]- विकिव्हॉयेज वरील झांझिबार पर्यटन गाईड (इंग्रजी)
- सरकारी संकेतस्थळ Archived 2009-12-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
6°08′S 39°19′E / 6.133°S 39.317°E
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |