Jump to content

ताट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थाळी व वाट्यांमध्ये वाढलेले भारतीय जेवण

ताट हे एक पसरट, आठ ते पंधरा इंच व्यासाचे वर्तुळाकार बुटके पात्र आहे. मराठी पद्धतीच्या जेवणासाठीचे भात-पोळीसारखे अन्न ताटात वाढतात. ताट हे पितळेचे किंवा चांदीचे असते. ताटाचे काठ हे एखाद इंच लांबीचे असून ताटाशी विशाल कोन केलेले व बाहेरच्या बाजूला दुमडलेले असतात. जर काठाचा हा कोन नव्वद अंशाचा असेल तर त्या ताटाला थाळी किंवा गुजराती पद्धतीची थाळी म्हणतात. महाराष्ट्राच्या बाहेर ताटाऐवजी बहुधा थाळीचा वापर होतो. थाळी जर पितळेची असेल तर तिला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पितळी म्हणतात.

वाटी ही ताटाची जोडीदारीण असते. ताट-वाटी किंवा ताटे-वाट्या हे शब्द असेच उच्चारले जातात.

ताटाचा व्यास जर आठ इंचापेक्षा कमी असेल तर त्याला ताटली म्हणतात.