Jump to content

म्यानमारमधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्यानमारमधील बौद्ध
म्यानमारमधील एक विहार (बौद्ध मंदिर)
एकूण लोकसंख्या

४,५१,८५,४४९
प्रमाणः- ८९.८% (इ.स. २०१४)

लोकसंख्येचे प्रदेश
संपूर्ण बर्मी प्रांत
भाषा
लाओ
धर्म
बौद्ध धर्म
संबंधित वांशिक लोकसमूह
बर्मी व्यक्ती


म्यानमारमधील बौद्ध धर्म प्रामुख्याने थेरवाद परंपरेचे आहे, जो देशाच्या ९०% लोकसंख्येद्वारे अनुसरला जातो.[][] लोकसंख्येतील भिक्खूंच्या संख्येनुसार आणि धर्माच्या आधारावर मिळविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार हा सर्वाधिक धार्मिक बौद्ध देश आहे.[] प्रामुख्याने बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.

इतिहास

[संपादन]
१८ व्या शतकातील लोकनाथ यांचे शिल्प
भिक्खू संकल्प चित्र (इ.स. १७९५)

म्यानमारमधील बौद्ध धर्माचा इतिहास कदाचित दोन हजार वर्षांपेक्षा अधिक विस्तारित आहे. पिणयास्मी यांनी इ.स. १८३४ मध्ये लिहिलेल्या सासन वाम्सा ग्रंथात म्यानमार मधील बौद्ध धर्माचा उल्लेख आहे. महावस्मा या पाली काव्य संग्रहात राजा अशोक यांनी पाचव्या शतकात सोना आणि उत्तरा या दोन बौद्ध भिक्खुंना इ.स.पू. २२८ मध्ये श्रीलंका व सुवर्णभूमी येथे पाठवल्याचा उल्लेख आहे.

तिसऱ्या शतकातील आंध्र इक्षुकु या शिलालेखात किरातस यांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केल्याचा उल्लेख आढळतो.[] याच कालखंडात सुरुवातीच्या चीनी ग्रंथांत म्यानमारला "लियू-यांगचे राज्य" असे संबोधले जाते, जिथे सर्व लोक बुद्धांची पूजा करतात आणि हजारो श्रमण उपासना करतात. हे राज्य बर्मा मध्य प्रांतातील एक राज्य होते.

पाली आणि संस्कृत पुरातन अभिलेखानुसार पियू आणि मोन या म्यानमार मधील भाषेने मध्य आणि अंत्यबर्मा भूभाग व्यापला होता. ११ वे ते १३ व्या शतकापर्यंत पांगण साम्राज्याने अनेक स्तूप आणि बौद्ध विहारे बांधली. अरी बौद्ध युगामध्ये बोधीसत्त्व आणि नाग यांची पूजा होत असे.थेरवादी बौद्ध धर्म बमर राजा अनवरथ (इ.स. १०४४ - इ.स. १०७७) यांनी प्रथमच ११ व्या शतकात बागान येथे प्रत्यारोपित केला.[]

इ.स. १०५७ मध्ये त्रिपिटक प्राप्त करण्यासाठी अनावरथाने सोम शहराचे थोटन जिंकण्यासाठी सैन्य पाठवून दिले. त्याला सोम भिक्खु, शिन अहाहान, थेरवादी बौद्ध धर्मात धर्मांतरीत केले. शिन अहाहनच्या सल्ल्यामुळे सोम राजा मंजुळल यांनी पालीतील ग्रंथांचे तीस संच ताब्यात घेतले. मॉन संस्कृती, त्या वेळी, मुख्यत्वे बागान मध्ये स्थित बामार संस्कृती मध्ये संम्मिलीत करण्यात आली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "www.cia.gov" (इंग्रजी भाषेत). 2010-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Burma—International Religious Freedom Report 2009". ११ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  3. ^ Cone & Gombrich, Perfect Generosity of Prince Vessantara, Oxford University Press, 1977, page xxii
  4. ^ Sylvain Lévi, "Concept of Tribal Society" in Pfeffer, Georg; Behera, Deepak कुमार, eds. (2002). Concept of tribal society. New Delhi: Concept Pub. Co. ISBN 978-8170229834.
  5. ^ Lieberman, Victor B (2003). Strange Parallels: Southeast Asia in Global Context, C. 800-1830, Volume 1: Integration on the Mainland. Cambridge University Press. pp. 115–116. ISBN 978-0-521-80496-7.

बाह्य दुवे

[संपादन]