युग
Appearance
मुख्य विचार
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग, दुसरे त्रेता, तिसरे द्वापार व चौथे कलियुग. सध्या कलियुग चालू असून ते इ. पू. ३१०१ ला महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर ३६ वर्षांनी सुरू झाले..
युगांची लक्षणे:
सत्ययुग :
सत्य युग हे सत्याचे व परिपुर्णतेचे युग मानले जाते. या युगातील मानव हा परिपुर्ण असतो असे मानले जाते. या युगातील मानव प्रचंड बलशाली, ओजस्वि, सात्त्विक व प्रामणिक असतात असे पौरणिक वाङमयामध्ये अढळते. या युगात मानव आनंदी, सुखि व समधानी व सर्व दुःख , तणाव , भय , रोग मुक्त जीवन जगतात. या युगतिल मानवाची जीवन मर्यादा ही १,००,००० होती.यात मानव सहस्र वर्ष तपचश्चर्या करत.