लेह
लेह | ||||||
भारतामधील शहर | ||||||
देश | भारत | |||||
प्रदेश | लडाख | |||||
जिल्हा | लेह | |||||
क्षेत्रफळ | ९.१५ चौ. किमी (३.५३ चौ. मैल) | |||||
समुद्रसपाटीपासुन उंची | ११,५०० फूट (३,५०० मी) | |||||
लोकसंख्या (२०११) | ||||||
- शहर | ३०,८७० | |||||
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) | |||||
https://leh.nic.in |
लेह हे भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. लेह शहर हिमालय पर्वतरांगेत सिंधू नदीच्या काथावर समुद्रसपाटीपासून ११,५०० फूट उंचीवर वसले आहे. लेहच्या पूर्वेला तिबेटचे पठार तर पश्चिमेला काश्मीरचे खोरे आहेत. ऐतिहासिक काळापासून लडखच्या राजतंत्राच्या राजधानीचे शहर असलेले लेह सिंधू नदीच्या खोऱ्यामधील एक प्रमुख वाणिज्य व व्यापार केंद्र राहिलेले आहे.
इ.स. २०११ साली लेह शहराची लोकसंख्या सुमारे ३०,००० होती. लडाखी, बाल्टी व हिंदी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लेहमधील बहुसंख्य रहिवासी बौद्ध अथवा हिंदू धर्मीय आहेत.
लेह शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरसोबत ५३४ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग १ द्वारे जोडले गेले आहे. तसेच उत्तर-दक्षिण धावणारा ४२८ किमी लांबीचा लेह–मनाली महामार्ग लेहला हिमाचल प्रदेशमधील मनाली शहरासोबत जोडतो. लेह येथील लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावरून एर इंडिया व इतर विमान कंपन्या दिल्ली, श्रीनगर, चंदीगढ इत्यादी शहरांसोबत थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिव्हॉयेज वरील लेह पर्यटन गाईड (इंग्रजी)
- लेह येथील बातम्या Archived 2022-04-08 at the Wayback Machine.