विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २०१२
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई) उच्चार (सहाय्य·माहिती));हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. सचिन तेंडुलकर, हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके करणारा एकमेव खेळाडू आहे. शिवाय विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सचिनला सर डॉन ब्रॅडमन नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला १९९७-१९९८ मधील खेळासाठी राजीव गांधी खेलरत्न (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि १९९९ मध्ये पद्मश्री ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला.
१०० धावा १०० वेळा करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू आहे, त्याने मार्च २०१२ च्या एशिया कप मध्ये हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले. १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली.