सेलेस्टिया
मूळ लेखक | ख्रिस लॉरेल |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | २००१ |
सद्य आवृत्ती |
विंडोज: १.६.१ (७ जून २०११) मॅक ओएस एक्स: १.६.१ (६ जून २०११) लिनक्स: १.५.१ (५ मे २००८) |
विकासाची स्थिती | सद्य |
संगणक प्रणाली | क्रॉस-प्लॅटफॉर्म |
संचिकेचे आकारमान |
३४.४ एमबी (विंडोज) ३८.७ एमबी (मॅक ओएस एक्स) २७.७ एमबी (लिनक्स) ५२.६ एमबी (स्रोत) |
सॉफ्टवेअरचा प्रकार | शैक्षणिक सॉफ्टवेर |
सॉफ्टवेअर परवाना | ग्नू जीपीएल |
संकेतस्थळ | शॅटर्स.नेट |
सेलेस्टिया ही एक त्रिमितीय खगोलशास्त्रीय संगणक आज्ञावली आहे. ही आज्ञावली हिप्पार्कस सूचीवर आधारित आहे व वापरकर्त्यास साऱ्या विश्वात फेरफटका मारण्याची मुभा देते. त्यामुळे आपण साऱ्या विश्वात आपण कोणत्याही दिशेने, कोणत्याही वेगाने व कोणत्याही वेळाच्या वेगात जाऊ शकतो. सेलेस्टिया ग्रहांचे, ताऱ्यांचे व दीर्घिकांचे त्रिमितीय दृश्य ओपनजीएलच्या सहाय्यने दाखवते.
नासा व इसा यांनी सेलेस्टियास त्यांच्या शैक्षणिक व आउटरीच प्रोग्राम्समध्ये वापरले आहे.
सेलेस्टिया मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स या संगणक प्रणाल्यांसाठी उपलब्ध आहे. ग्नू जनरल पब्लिक परवान्यावर प्रकाशित झालेले सेलेस्टिया हे एक मोफत सॉफ्टवेर आहे.
कार्य
[संपादन]सेलेस्टिया तब्बल १,२०,००० तारे असलेली हिप्पार्कस सूची दर्शवितो. तसेच तो ग्रहांच्या कक्षांसाठी व्हीएसओपी८७ ही अत्यंत अचूक पद्धत वापरतो.
सेलेस्टियाच्या वापरकर्त्यांना साऱ्या विश्वात साध्या कळफलकाच्या कीज वापरून कोणत्याही वेगात (०.००१ मी/सेकंद ते अनेक प्रकाशवर्ष/सेकंदांपर्यंत) भ्रमण करता येते. दृष्टीरेषा पुढे, मागे कुठेही सेट करता येते. वापरकर्त्यांना संचालने तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू यांच्या भोवती कक्षेत भ्रमण करणे, त्यांचा पाठलाग करणे, तेजोमेघ व दीर्घिकांमधून जाणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देतात. (१०,००० च्या वर दीर्घिका उपलब्ध)
विस्तारके
[संपादन]कार्यरत सदस्य सभेने सेलेस्टिया प्रारंभिक प्रोग्रामसाठी १८ गीगाबाईटची विस्तारके उपलब्ध केली आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-10-16 at the Wayback Machine.
- सेलेस्टिया अॅड-वन्सचे प्रमुख केंद्र
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |