Jump to content

"मित्र (तारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: चित्र:Alpha, Beta and Proxima Centauri (1).jpg|300px|इवलेसे|उजवे|मित्र अ आणि मित्र ब तारे आणि...
 
छो added Category:तारा using HotCat
ओळ ६: ओळ ६:


== संदर्भ ==
== संदर्भ ==

[[वर्ग:तारा]]

२१:०२, १७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

मित्र अ आणि मित्र ब तारे आणि वर्तुळात प्रॉक्झिमा सेंटॉरी तारा

मित्र ही सूर्यमालेपासून सर्वात जवळील ताऱ्यांची प्रणाली आहे. तीचे पृथ्वीपासूनचे अंतर ४.३७ प्रकाशवर्ष (१.३४ पार्सेक) इतके आहे.[]. तीचे बायर नाव अल्फा सेन्टॉरी (Alpha Centauri; α Cen) आहे व तीला इंग्रजीमध्ये रायजेल केंट (Rigil Kent) असेही म्हणतात. पृथ्वीवरून एकच तारा दिसत असला तरी त्यामध्ये एक द्वैती ताऱ्यांची जोडी आहे ज्यामधील ताऱ्यांना मित्र "अ" आणि मित्र "ब" म्हटले जाते आणि एक तिसरा तारादेखील आहे जो यांपासून काही अंतरावर असून त्याला मित्र "क" किंवा प्रॉक्झिमा सेंटॉरी असे नाव दिले गेले आहे. त्यातील द्वैती तारे उघड्या डोळ्यांनी -०.२७ आभासी दृश्यप्रतीचा एकच तारा असल्यासारखे दिसतात. हा ताऱा नरतुरंग या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी आणि पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी (सूर्य वगळता) व्याध आणि अगस्ती ताऱ्यांपाठोपाठ तिसरा सर्वात तेजस्वी आहे. सूर्य वगळता प्रॉक्झिमा सेंटॉरी हा पृथ्वीपासून ४.२४ प्रकाशवर्श अंतरावरील सर्वात जवळचा तारा आहे. पण तो अतिशय लहान असल्याने दुर्बिणीशिवाय दिसू शकत नाही.

गुणधर्म आणि घटक

मित्र अ हा द्वैती ताऱ्यांमधील मुख्य तारा आहे. मित्र अ हा जी२ व्ही श्रेणीचा सूर्यासारख्या पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा मुख्य अनुक्रम तारा आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या १.१ पट आहे आणि त्रिज्या सूर्याच्या १.२३ पट आहे. हा तारा सूर्य वगळता आकाशातील चौथा सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याची तेजस्विता सूर्याच्या १.५१९ पट आहे.[]

संदर्भ

  1. ^ विल्किन्सन, जॉन. (इंग्रजी भाषेत). pp. २१९-२३६. doi:10.1007/978-3-642-22839-1_10. ISSN 1614-659X http://link.springer.com/book/10.1007/978-3-642-22839-1. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ कार्वेला पिएर, थेवेनिन फ्रेडेरिक. (इंग्रजी भाषेत) https://www.eso.org/public/news/eso0307/. Missing or empty |title= (सहाय्य)