Jump to content

नागालँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नागालँड

भारत
—  राज्य  —
Map

२६° १३′ ४५.०१″ N, ९४° ३९′ ०९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १६,५७९ चौ. किमी
राजधानी कोहिमा
मोठे शहर दीमापुर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
१९,८८,६३६ (24th)
• १२०/किमी
भाषा इंग्रजी
राज्यपाल निखिल कुमार
मुख्यमंत्री नैफीउ रीयो
स्थापित १ डिसेंबर इ.स. १९६३
विधानसभा (जागा) नागालँड विधानसभा (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-NL
संकेतस्थळ: Nagaland.nic.in
नागालँड चिन्ह
नागालँड चिन्ह

नागालॅंड Nagaland.ogg उच्चार हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमीचॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊसकापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.

इतिहास

[संपादन]

नागभूमीत राहणाऱ्यांना किरात म्हणले जाई.. नाग ही एकच जनजाती नाही. अंगामी, आअ, कुबई, कचा, लेंगमी, कोन्याक, रेंगमा, जेलियांग अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचेचंद्रकुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव सूर्य आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रेंगमाच्या दृष्टीने सूर्य पुरुष आहे तर [[]] हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण रामायण काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद याची पत्‍नी नागभूमीची होती, तर. उलुपी ही अर्जुनाची पत्‍नी नागकन्या होती.

नागालॅंडमधील भारत सरकारविरोधी फुटीरवादी संघटना

[संपादन]
  • एनएससी‍एन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालॅंड :- या संस्थेची निर्मिती, एनएससी‍एन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला.
  • एनएससी‍एन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालॅंडचा काही भाग :- एनएससी‍एन-खापलांग संघटनेत ब्रह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली.
  • एनएससी‍एन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेला शस्त्रसंधी अजून कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे.
  • एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते.
  • झेडयूएफ : झेलियांगग्रॉंग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालॅंड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
लांगवा गाव, नागालँड मधील एक हेडहंटर

नागालॅंडवरील पुस्तके

[संपादन]
  • नागालॅंडच्या अंतरंगात (लेखिका - डॉ. अर्चना जगदीश). या मराठी पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.

भूगोल

[संपादन]

जिल्हे

[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - नागालॅंडमधील जिल्हे

नागालॅंड राज्यात एकूण ८ जिल्हे आहेत.