Jump to content

पाणलोट क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

panlot vikas programme was started by soil and water consevation department of maharashtra in 1992.

पाणलोट क्षेत्राचे एक उदाहरण.लाल तुटक रेषांच्या अंतर्गत असलेले क्षेत्र हे त्या नदी वा समुद्राचे/ पाणीसाठ्याचे पाणलोट क्षेत्र आहे.

भूपृष्ठाचे/जमिनीचे असे क्षेत्र, ज्यावर पडणारे पावसाचे सर्व पाणी, एखाद्या विशिष्ट नदीस/पाणीसाठ्यास येउन मिळते,ते क्षेत्र म्हणजे त्या नदीचे/पाणीसाठ्याचे पाणलोट क्षेत्र होय. एखाद्या गावाच्या भूजलाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना प्रथम त्या गावाचा भूजल नकाशा बनविला जातो. या नकाशावर आधी वेगवेगळ्या भूस्तरांचे विस्तार क्षेत्र व त्यांच्या रचनेसंबंधी माहिती भरली जाते. नकाशे तयार करणे हे मूलभूत काम आहे. या नकाशांनाच ‘टोपोशीट’ असे म्हणतात.. भूजलाचे चलनवलन जमिनीखाली होत असल्यामुळे भूजल हा कायमच वलय नसलेला विषय आहे. पाण्याचा वाढलेला बेसुमार उपसा आणि त्यामुळे भेडसावणारी भीषण पाणीटंचाई यामुळे नजरेआड दडलेल्या भूजलाने आता सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली आहे. भूजलाचे चलनवलन भूगर्भातील खडक, माती आणि स्थानिक पर्जन्यमान या सगळ्या गोष्टींवर किती अवलंबून आहे, तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या बसाल्ट खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पाणी व्यवस्थापन किती आवश्यक आहे, हेसुद्धा आपल्या लक्षात आले असेलच. पाणी व्यवस्थापनातील समस्यांची जटिलता, पाणीपुरवठा व मागणी यांच्यातील तफावतीमुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर विशेष भर

[संपादन]

लागवडी लायक जमिनीवरील उपचार

[संपादन]
  • समपातळीवरील जैविक बांध : यामध्ये खस, सुबाभूळ अथवा स्थानिक गवताचे बांध घालणे.
  • भातखाचरे : भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी भातखाचरे करणे.
  • मजगीकरण : कोकणपश्‍चिम घाट विभागासाठी मजगीकरण.

लागवडीस अयोग्य जमिनीवरील उपचार

[संपादन]
  • अत्यंत हलक्या अशा जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. अशा जमिनीवर त्या भागात येणाऱ्या गवतांचे बी फेकणे.
  • वृक्ष लागवड व कुरण विकास.
  • समपातळीवर जैविक बांध आणि
  • जैविक पट्टे तयार करणे.

ओघळीचे नियंत्रक

[संपादन]
  • लाईव्ह चेक डॅम
  • ब्रशवूड डॅम
  • लूज बोल्डर स्ट्रक्चर्स
  • गॅबीयन बांधकामे
  • मातीचे व सिमेंटचे नालाबंध
  • डायव्हर्शन बंधारे
  • भूमीगत बंधारे आणि
  • जेथे कठीण खडकामुळे भूगर्भात पाणी साठा होऊ शकत नाही त्या ठिकाणी हायड्रो फ्रॅक्चरींग.

संदर्भ

[संपादन]

http://panlotkshetravikas.weebly.com/