Jump to content

वरुण गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वरुण गांधी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद

वरुण गांधी
वरुण गांधी (१९ एप्रिल २००९)

वरुण संजय गांधी ( मार्च १३, इ.स. १९८०) हे काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी व त्यांच्या भाजपमधील पत्नी मेनका गांधी यांचे चिरंजीव आहेत. इ.स. २००९च्या भारतीय लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथून भाजपतर्फे निवडणूक लढले आहेत.

पिलिभीतमध्ये झालेल्या प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त भाषणाबद्दल केंदीय निवडणूक आयोगाने वरुण यांच्या उमेदवारीलाही नकार दिला. त्या विरोधात 'विरोधकांना माझी राजकीय कारकी‍र्द खराब करायची आहे' हा खुलासा करून वरुण यांनी त्यांच्या भाषणाची कोणीतरी बनावट सीडी तयार केल्याचा आरोप करीत आपल्यावरील बंदी मागे घ्यावी, असा अर्ज दाखल केला. परंतु कोर्टाने त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले. आक्षेपार्ह विधाने करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणणाऱ्या, तसेच आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई ओढवून घेणारे भाजपचे तरुण नेते वरुण गांधी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्र भाजपमधून सर्वाधिक मागणी आहे. तसेच उत्तर प्रदेशातही त्यांना आपल्या प्रचारसभांमध्ये बोलवण्यास अनेक कार्यकर्ते उत्सुक असतात.

पार्श्वभूमी

[संपादन]

वरुण गांधी यांचा जन्म १३ मार्च १९८० मध्ये न्यू दिल्लीमध्ये झाला. त्यांचे पालकांचे नाव मेनका गांधी आणि संजय गांधी आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू एक विमानातील एका दुर्घटनेत जून १९८० मध्ये झाला, तेव्हा वरुण गांधींचे वय केवळ ३ महिन्यांचे होते.

मार्च २९ इ.स. २००९ रोजी वरुण गांधी यांच्यावर दंगा पसरवण्यास कारणीभूत ठरवल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली.

संदर्भ

[संपादन]

[१]