हनुमान जयंती
हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय.[१] चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.[२]
स्वरूप
[संपादन]या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे, त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.[३] हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते. या दिवशी उत्तर भारतात विशेष रूपाने व्रत- उपवास यांचे पालन केले जाते. रामायणातील सुंदर कांड याचा पाठ वाचला जातो. हनुमान चालिसा याचा पाठ या दिवशी करणे महत्वाचे मानले जाते.[४]
जन्मकथा
[संपादन]वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे.[५] हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात.[६] भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे.[७]
पूजा पद्धती
[संपादन]महाराष्ट्र राज्यात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे. उत्तर भारतात सुद्धा हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे.[८]
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात १७ व्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. त्यासाठी ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि बलाच्या उपासनेचे महत्व प्रस्थापित केले.[९] रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते.[१०]
चित्रदालन
[संपादन]भारतात असलेल्या हनुमानाच्या विविध मूर्ती
[संपादन]-
गुडीवाड, आंध्र प्रदेश
-
मैलम्पावली
-
हळ्ळेबीड
-
ग्वालियर, म.प्र.
-
बुलढाणा
-
बंगलोर
-
दमणजोडी
-
अब्बिरजुपालेम
-
झाकू मंदिर
-
हल्दियागड
-
विशाखपट्टनम्
-
छत्तरपूर
-
नीमच, म.प्र.
-
गिरिसोला, ओडिशा
-
नृसिंहनाथ
-
परिताला,विजयवाडा, आंध्र प्रदेश
भारताबाहेर असलेल्या हनुमानाच्या विविध मूर्ती
[संपादन]-
मलेशिया
-
त्रिनिदाद
-
काठमांडू, नेपाळ
-
काठमांडू, नेपाळ
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Sadaiv, Shashikant (2020-01-01). Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-87980-55-6.
- ^ "Hanuman Jayanti 2021: Date, Time, Significance Of Hanuman Jayanti Here". NDTV.com. 2021-04-26 रोजी पाहिले.
- ^ Staff, India com Lifestyle (2021-03-09). "Hanuman Jayanti 2021 Date, Time: Why Hindus Celebrate Hanuman Janmotsav in India? Know Significance, Importance". India News, Breaking News | India.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-26 रोजी पाहिले.
- ^ Sadaiv, Shashikant (2020-01-01). Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar: Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar: Spiritual and Scientific Foundations of Fasting (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-87980-55-6.
- ^ Singh, Mukti Nath (2019-01-01). Hanumanji Ke Jeevan Ki Kahaniyan: Bestseller Book by Mukti Nath Singh: Hanumanji Ke Jeevan Ki Kahaniyan (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-88984-00-3.
- ^ Vinay, Dr (2017-08-08). Ramayan Ke Amar Patra : Pawanputra Hanuman : रामायण के अमर पात्र : हनुमान (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5278-425-7.
- ^ Ludvik, Catherine (1994). Hanumān in the Rāmāyaṇa of Vālmīki and the Rāmacaritamānasa of Tulasī Dāsa (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 978-81-208-1122-5.
- ^ Puri 'Gyaneshwar, Dr Umesh; पुरी 'ज्ञानेश्वर', डॉ उमेश (2019-09-10). Hanuman Chalisa Meree Drshti Mein: हनुमान चालीसा मेरी दृष्टि में (हिंदी भाषेत). Dr. Umesh Puri.
- ^ "समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती माहिती आहेत का? पाहा Photos". News18 Lokmat. 2023-03-25. 2023-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-31 रोजी पाहिले.
- ^ Āḷatekara, Sadāśiva Khaṇḍo (1974). Śrīsamartha caritra. Konṭinenṭala Prakāśana.